‘एफटीआयआय’च्या संचालकपदी प्रशांत पाठराबे

July 17, 2015 8:37 PM0 commentsViews:

ftii-director_650x400_71437130083

17 जुलै : गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या पुण्यातील ‘फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’च्या संचालकपदी प्रशांत पाठराबे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ‘एफटीआयआय’चे संचालक डी.जे. नारायण यांच्या जागा पाठराबे घेतील. त्यांच्याकडे संचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे. पाठराबे सध्या ‘नॅशनल फिल्म अर्काइव्ह ऑफ इंडिया’चे संचालक आहेत.

डी.जे.नरेन आज (शुक्रवारी) निवृत्त झाले. ‘एफटीआयआय’चे संचालक म्हणून नरेन यांनी चार वर्ष काम पाहिले. 2014मध्ये त्यांचा कार्यकाळ संपला होता. मात्र त्यानंतर त्यांना एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली होती.

केंद्र सरकारने FTIIच्या अध्यक्षपदी अभिनेते गजेंद्र चौहान यांची नियुक्ती केल्यापासून विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केले आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाशी चर्चा केल्यानंतरही यावर तोडगा निघू शकला नाही. या पार्श्वभूमीवर संचालकपदी पाठराबे यांची नियुक्ती झाली आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close