मुंबई महानगरपालिकेला बेस्ट मेगा सिटी पुरस्कार

December 3, 2009 1:51 PM0 commentsViews: 79

3 डिसेंबर मुंबई महानगरपालिकेला बेस्ट मेगा सिटीचा पुरस्कार मिळाला आहे. जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय नागरी पुनर्निर्माण अभियानांतर्गत मुंबईबरोबरच नवी मुंबई, नागपूर आणि पिंपरी चिंचवड या महानगरपालिकांनाही दिल्लीत झालेल्या शानदार कार्यक्रमात पंतप्रधानांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आले. देशातल्या अतिउत्कृष्ट महानगरपालिकेचा बेस्ट मेगा सिटी हा सर्वोच्च पुरस्कार मंुबई महानगरपालिकेला मिळाला. महापौर श्रद्धा जाधव आणि अतिरिक्त आयुक्त आर.ए.राजीव यांनी स्वीकारला. नवी मुंबई महानगरपालिकेला सांडपाणी आणि मलनिस्सारण व्यवस्थापनातील सुधारणांसाठी. तर उत्कृष्ट पाणी पुरवठ्यासाठीचा पुरस्कार नागपूरला. तसेच पिंपरी चिंचवडला गृहनिर्माण प्रकल्पांसाठीचा पुरस्कार देण्यात आला. पंधरापैकी 4 पुरस्कार महाराष्ट्रानेच पटकावले आहेत.

close