नवजात बालकाची डॉक्टरांनी केली हत्या

December 4, 2009 8:54 AM0 commentsViews: 7

4 डिसेंबर नवजात बालकाची हत्या केल्याप्रकरणी दोन महिला डॉक्टरांना पेणच्या न्यायालयाने 7 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. डॉ. उषा बाक्रे आणि डॉ. प्रमोदिनी परांजपे यांनी एका नवजात बाळाला बायोगॅसच्या टाकीत क्रुरपणे टाकून दिलं. खालापूर तालूक्यातल्या विचारवाडी इथे रहाणार्‍या एका 15 वर्षांच्या मुलीवर राजू नावाच्या तरूणाने बलात्कार केला होता. त्यानंतर ही मुलगी गरोदर होती. 7 महिन्यांची गरोदर असताना या मुलीची तब्येत बिघडल्याने तिला खोपोलीच्या परांजपे नर्सिंग होममध्ये दाखल करण्यात आलं. यावेळी बलात्कार केलेल्या मुलाशी संगनमत करून या दोन महिला डॉक्टरांनी प्रसूतीनंतर बाळाची हत्या केली होती. या दोन डॉक्टरांवर आता भारतीय दंड विधान कलम 376, 363, 315, 406 आणि 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

close