मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर आडोशी बोगद्याजवळ दरड कोसळली, 2 ठार

July 19, 2015 10:46 PM0 commentsViews:

pune_express way 319 जुलै : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर खंडाळा घाटात आडोशी बोगद्याजवळ दरड कोसळून झालेल्या अपघातात दोन जण ठार आणि तीन जण जखमी झाले आहे. दरड कोसळल्यामुळे सुपरफास्ट एक्स्प्रेस वे ‘स्लो एक्स्प्रेस वे’ झालाय. दुपारपासून वाहतूक ठप्प झालीये. मुंबईकडे येणारी वाहतूक खोळंबलीये. दरड हटवण्याचं काम अद्यापही युद्धपातळीवर सुरू आहे. पुण्याकडे जाणारे दोन मार्ग सुरू करण्यात आले आहेत. तर मुंबईकडे जाणारी एक लेन सुरू आहे.

आज रविवारी सुट्टीच्या दिवशी खंडाळा घाटात दरड कोसळल्यामुळे मुंबई एक्स्प्रेस वे सुपर जाम झाला. खंडाळा घाटात आडोशी बोगद्यासमोरच दरड कोसळली. त्यामुळे मुंबईकडे येणारी वाहतूक जागेवर थांबली. दरडीखाली येऊन दोन जणांचा दुर्देवी मृत्यू झाला. भाईंदर येथे राहणारे दिलीपभाई गोपाळभाई पटेल (52) आणि डोंबिवलीचे शशिकांत धामणकर यांचा या अपघातात मृत्यू झाला आहे. तर निर्मला पटेल, सुशीलाबाई धामणकर आणि मंगल माने जखमी झाल्या आहेत. पोकलेन, डंपर, जेसीबीच्या साह्यानं दरड हटवण्याचं काम काम युध्दपातळीवर सुरू आहे. 2 ते 3 तासात रस्ता मोकळा होण्याची शक्यता असून वाहतूक पूर्ववत होण्याची अपेक्षा आहे. तोपर्यंत पुण्याकडे जाणारे दोन मार्ग सुरू करण्यात आले आहेत. तर मुंबईकडे जाणारी एक लेन सुरू आहे. दरम्यान, मृतांच्या कुटुंबीयांना राज्यसरकारकडून प्रत्येकी 4 लाख रुपये आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे अशी माहिती एमएसआरडीसी मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. तसंच मृतांच्या नातेवाईकांना जास्तीत जास्त मदत करणार असल्याचं आश्वासन एकनाथ शिंदे यांनी दिलंय.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close