अण्णाभाऊ साठे महामंडळ भ्रष्टाचार प्रकरणी रमेश कदमांसह 5 जणांवर गुन्हे दाखल

July 19, 2015 10:55 PM0 commentsViews:

ramesh_kadam_ncp19  जुलै : अण्णाभाऊ साठे महामंडळ भ्रष्टाचार प्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार रमेश कदम यांच्यासह पाच जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणात सीआयडीने रविवारी दहिसर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केलाय.

कदम यांच्याविरुद्ध फसवणूक, भ्रष्टाचाराच्या कलमाखाली गुन्हे दाखल केले आहेत. रमेश कदम यांच्यासह महामंडळाचे दोन अधिकारी, दोन समर्थकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

रमेश कदम सध्या सोलापूर जिल्हातील मोहोळ मतदारसंघाचे आमदार आहेत. ते अजित पवारांचे विश्वासू मानले जातात.

त्यांच्या कार्यकाळात तब्बल 385 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार झाल्याचा अंदाज आहे. या प्रकरणी सीआयडीन चौकशी पूर्ण केली असून त्याचा अहवाल मुख्यमंत्र्यांकडे सोपवला आहे.

दरम्यान, गुन्हा नोंदवण्यात आल्यानंतर कदम यांना अटक होण्याची शक्यता असून, सोलापूर जिल्ह्यात चारही बाजूने नाकाबंदी करण्यात आलीये. भाजप सरकारनं आकसापोटी कारवाई केल्याचा कदम यांच म्हणणं आहे रमेश कदम यांनी या प्रकरणी पुण्यात पत्रकार परिषद घेतली होती. पण ही पत्रकार परिषद अर्धवट सोडून ते निघून गेले.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close