सांगलीत जितेंद्र आव्हाडांवर हल्ल्याचा प्रयत्न, कार्यकर्त्यांची तुफान हाणामारी

July 20, 2015 9:31 AM0 commentsViews:

jitendra awadha353
20 जुलै : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर सांगलीमध्ये हल्ल्याचा प्रयत्न झाला. शिवसन्मान जागर परिषदेत शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घालत जितेंद्र आव्हाडांवर हल्ल्याचा प्रयत्न झाला. आव्हाडांच्यासमोरच कार्यकर्त्यांनी तुफान हाणामारी केली.या हाणामारीत 5 जण जखमी झाले. पोलिसांनी शिवप्रतिष्ठानच्या पाच कार्यकर्ते ताब्यात घेतले आहे. ही सर्व मारामारी पोलिसांच्या समोर झाली.

सांगलीमध्ये शिवसन्मान जागर परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देवू नये, यासाठी ही परिषद आयोजित करण्यात आली होती. या परिषदेत आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजीराव भिडे यांच्या वर टीका केली. आव्हाड याचं भाषण सुरू असताना शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी स्टेजवर चढले आणि आव्हाडांच्या दिशेनं धाव घेतली. यावेळी जागर परिषदेच्या कार्यकार्त्यांनी स्टेजचा ताबा घेत शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांना बेदम चोप दिला. खुर्च्या आणि माईक च्या साह्याने मारामारी करण्यात आली.  ++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close