मुख्यमंत्री आज शेतकर्‍यांसाठी विशेष पॅकेज जाहीर करण्याची शक्यता

July 20, 2015 10:10 AM0 commentsViews:

cm devendra fadanvis420 जुलै : विधानसभा अधिवेशनाच्या दुसर्‍या आठवड्याचा आजचा पहिला दिवस आहे. शेतकर्‍यांच्या कर्जमाफीवरून विरोधकांना रणकंदन घातल्यानंतर आज (सोमवारी) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शेतकर्‍यांसाठी वेगळ्या पॅकेजची घोषणा करण्याची शक्यता आहे.

अधिवेशनात गेल्या आठवड्यातले दोन दिवस शेतकर्‍यांच्या प्रश्नावर चर्चा सुरू होती, त्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज (सोमवारी) दुपारी उत्तर देणार आहेत. विरोधकांनी जोरदारपणे कर्जमुक्तीची मागणी केली होती पण मुख्यमंत्र्यांनी ही मागणी फेटाळली होती, त्यामुळं ते आज कुठली घोषणा करतात याकडे सगळ्यांचं लक्षं लागलंय. मुख्यमंत्री शेतकर्‍यांसाठी पॅकेज जाहीर करणार का? की व्याजमाफी देणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.

विशेष म्हणजे, अधिवेशनाच्या अगोदरचा मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफी देता येणार नाही असं स्पष्ट केलं होतं. त्यामुळे विरोधकांच्या हाती आयतं कोलीत लागलं. अपक्षेप्रमाणे विरोधकांनी अधिवेशनाचे सुरुवातीचे दोन दिवस जोरदार आंदोलनं करत कामकाज बंद पाडलं होतं. अखेर शेतकर्‍यांच्या कर्जमाफीवर चर्चा सुरू झाली खरी पण, सरकारकडून अजूनही कोणताही ठोस अशी घोषणा करण्यात आलेली नाही. आता मुख्यमंत्री काय बोलत आणि कोणती घोषणा याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close