‘नच बलिये’त पुन्हा ‘जय महाराष्ट्र’, अमृता खानविलकर ठरली विजेती

July 20, 2015 9:15 AM0 commentsViews:

amruta nacha baliye3320 जुलै : ‘नच बलिये’ या डान्स रिऍलिटी शोच्या सातव्या सीझनमध्ये मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकर आणि हिमांशू मल्होत्रा या जोडीने बाजी मारलेली आहे. रश्मी-नंदिश, मयुरेश-अजीशा आणि करिष्मा-उपेन यांना मागे टाकत त्यांनी विजेतेपदाची ट्रॉफी पटकावलेली आहे.

महाअंतिम सोहळ्यातही दिमाखदार परफॉर्मन्स सादर करुन अमृता-हिमांशू जोडीने परीक्षकांसह प्रेक्षकांचीही मनं जिंकली. चेतन भगत, प्रीती झिंटा आणि मास्टर मर्झी हे तीनही परीक्षक सुरुवातीपासूनच अमृता आणि हिमांशू या जोडीचे चाहते होतेच.

यापूर्वीसुद्धा मराठमोळी जोडी सचिन आणि सुप्रिया ही मराठमोळी जोडी ‘नच बलिए’ची महाविजेती ठरलेली होती.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close