संजय राऊत यांची राज्यसभा हक्कभंग समितीसमोर माफी

December 4, 2009 9:16 AM0 commentsViews: 2

4 डिसेंबर उत्तर भारतीयांविरोधात वादग्रस्त लिखाण केल्याबद्दल शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी माफी मागितली आहे. 'एक बिहारी सौ बिमारी' नावाने 'सामनात' लिहिलेल्या अग्रलेखात उत्तरप्रदेश आणि बिहारच्या खासदारांवर टीका करण्यात आली होती. या अग्रलेखात लालुप्रसाद यादव आणि प्रभुनाथ सिंग यांच्यावरही टीका करण्यात आली होती. या लिखाणासंदर्भात राऊत यांना राज्यसभेच्या हक्कभंग समितीने नोटीस पाठवली होती. या समितीसमोर राऊत यांनी ही माफी मागितली आहे. शिवसेनेचे राज्यसभेतील खासदार संजय राऊत हे सामाना या शिवसेनेच्या मुखपत्राचे कार्यकारी संपादक आहेत. या प्रकरणाबद्दल अद्यापही राज्यसभेच्या समितीने अंतिम निर्णय घेतलेला नाही. मराठी विरोधात खासदार काम करतात असं त्यांनी अग्रलेखात लिहिलं होतं. संजय राऊत यांची माफी म्हणजे शिवसेनेचा दुटप्पीपणा आहे, अशी टीका मनसेचे सरचिटणीस शिरिष पारकर यांनी केली आहे.

close