वाजवा रे…

July 20, 2015 1:02 PM0 commentsViews:

20 जुलै : शिस्तबद्ध आणि तालात वाजणारा ढोल ताशा…पुण्यामधल्या सार्वजनिक गणेशोत्सवाचं हे खास वैशिष्ट्य…या ढोलताशा पथकांचा सराव आता सुरू होतोय. दरवर्षीप्रमाणे या ढोलताशा पथकांच्या वाद्य पूजनाचा कार्यक्रम रविवारी झाला. प्रसिद्ध गायक शंकर महादेवन यांच्या हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन झालं. पुण्यात गणेश चतुर्थी आणि गणेश विसर्जनाच्या दिवशी मानांच्या गणपतींच्या मिरवणुकीत ही ढोलताशा पथकं सहभागी असतात, या ढोल ताशा पथकांमध्ये आय टी ,डॉक्टर इंजिनिअर्स, एमबीए अशा उच्च विद्याविभूषित तरुण तरुणींचा मोठ्या प्रमाणावर समावेश असतो.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close