नागपूर-औरंगाबादला लोडशेडिंगचा अजूनही फटका

December 4, 2009 9:22 AM0 commentsViews: 5

4 डिसेंबर नागपूर, अमरावती आणि औरंगाबादमध्ये अजूनही लोडशेडिंग बंद झालेलं नाही. गेल्या हिवाळी अधिवेशनात नागपूर आणि अमरावती लोडशेडिंगमुक्त करण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. अखेर सरकारने 1 डिसेंबरपासून विदर्भातील या दोन शहरात लोडशेडिंग बंद करण्याचा निर्णय घेतला. झिरो लोडशेडिंग करण्यासाठी सरकारने नागपूरला 51 पैसे तर अमरावतीला 69 पैसे अधिभार लावला आहे. जो राज्यातील इतर शहरांच्या तुलनेत जास्त आहे. औरंगाबादमध्येही महावितरणने केलेली 1 डिसेंबर पासूनची लोडशेडिंग मुक्तची घोषणा हवेतच विरली आहे. घोषणेला तीन दिवस उलटून गेले तरीही औरंगाबादमध्ये लोडशेडिंग सुरुच आहे. शिवाय वीजदरवाढीचा भुर्दंडही नागरिकांना सहन करावा लागत आहे.

close