नादखुळा, शार्कला मुक्का लगावत वाचवला स्वत:चा जीव !

July 20, 2015 4:15 PM0 commentsViews:

20 जुलै : साऊथ आफ्रिकेत समुद्र किनार्‍यावर “JAWS” या इंग्रजी चित्रपटातला प्रसंग रिअल लाईफमध्ये घडावा  असंच काहीस घडलंय. सर्फिंग स्पर्धा सुरू असताना, एका खेळाडूवर शार्क माशानं हल्ला केला. पण, त्या पठ्‌ठ्याने न घाबरता शार्कच्या तोंडावर मुक्का लगावला आणि स्वत:चा जीव वाचवला. मिक फॅनिंग असं या खेळाडूचं नाव आहे.

shark attack4त्याचं झालं असं की, साऊथ आफ्रिकेतल्या ईस्टर्न कॉप भागात सॅमसंग गॅलक्सी वर्ल्ड सर्फिंग लिंग चम्पियनशिप सुरू आहे. मिक फॅनिंग सर्फिंग खेळाडू असून तो या स्पर्धेत सहभागी झाला होता. सर्फिंग करत असताना शार्क माशाने हल्ला चढवला. शार्क मिकला चावा घेण्याचा प्रयत्न करत होता. पण, मिकच्या प्रसंगावधानानं त्याचे प्राण वाचले.

मिकनं शार्कच्या तोंडावर जोराने मुक्का लगावला. त्यामुळे शार्क गांगरली आणि त्याची मिकवरची पकड ढिली झाली. तोपर्यंत बचाव दलाचे जवान मिकपर्यंत पोहचले आणि त्याची शार्कच्या तावडीतून सुटका केली. विशेष म्हणजे ही स्पर्धा टीव्हीवर लाईव्ह सुरू होती, आणि तेव्हा हे घडलं. म्हणून ही दृष्यंही लाईव्ह प्रक्षेपित झाली. हा व्हिडिओ जगभर गाजतोय.

 

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close