टाळ आंदोलनानंतर आता राष्ट्रवादीचं आरती आंदोलन

July 20, 2015 5:39 PM0 commentsViews:

arti andolan
20 जुलै : मुंबईतल्या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या जागेवरून सुरू असलेल्या वादावरून राष्ट्रवादीनं सरकारचा निषेध करत आरती आंदोलन केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयाच्या बाहेर गणपतीची आरती करून हे आंदोलन करण्यात आलं.

विरोधकांनी कल्पक आंदोलनांचा अजून एक नमुना आज पाहण्यास मिळालाय. मुंबईत होणार्‍या सार्वजनिक गणेश उत्सवाचा वाद गाजत असताना राष्ट्रवादी काँग्रेसने आज सार्वजनिक गणेशोत्सवाच्या समस्यांबाबत आरती आंदोलन केलं. सरकारला जाग आणण्यासाठी हे आंदोलन केल्याचं राष्ट्रवादीचे नेते सचिन अहिर यांनी सांगितलं.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close