शेतकर्‍यांना सरकारकडून कर्जमाफी नाहीच, विरोधकांचा सभात्याग

July 20, 2015 8:41 PM0 commentsViews:

vikhe patil

20 जुलै : मुख्यमंत्र्यांनी शेतकर्‍यांच्या कर्जमाफीवर निवेदन देताना शेतकर्‍यांना दिलासा देत विरोधकांवर जोरदार टीका केली. या वेळी त्यांनी राष्ट्रवादीचे आमदार अजित पवार, छगन भुजबळ, काँग्रेसचे आमदार आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना लक्ष्य केले.

मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीची थेट घोषणा करायला हवी. त्यांच्या शब्दांच्या भुलभुलैयात शेतकरी आणि आम्ही वाहून जाणार नाही. फडणवीस यांनी कर्जमाफीची घोषणा करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केली. तसेच मुख्यमंत्र्यांची उत्तरे असमाधानकारक असल्याचे सांगत विरोधकांनी सभात्याग केला.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close