बेपत्ता मच्छिमारांच्या शोधासाठी हायकोर्टात याचिका दाखल

December 4, 2009 9:24 AM0 commentsViews: 4

4 डिसेंबर फियान वादळात बेपत्ता झालेल्या मच्छिमारांना शोधण्याकरता सरकारने योग्य ती पावलं उचलावीत याकरता मंुबई हायकोर्टात एक याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेची दखल घेऊन रत्नागिरीचे कलेक्टर मधुकर गायकवाड यांनी कोर्टात एक प्रतिज्ञापत्र सादर केलं. त्यात त्यांनी मच्छिमारांसाठी काय केलं आणि काय करणार आहे, याबाबत उल्लेख केला आहे. पण मच्छिमारांच्या शोध मोहिमेबाबत एक शब्दही लिहिलेला नाही. फियान वादळात अनेक मच्छिमार बेपत्ता झाले आहेत. त्यांचा शोध घेण्यासाठी सरकारने ठोस अशी शोधमोहिम राबवावी अशी मागणी गेल्या अनेक दिवसांपासून होत आहे.

close