उल्हासनगर महानगरपलिकेवरही भगवा

December 4, 2009 10:38 AM0 commentsViews: 4

4 डिसेंबर मुंबई, ठाण्यापाठोपाठ उल्हासनगर महानगपालिकेवरही भगवा फडकला आहे. शुक्रवारी झालेल्या निवडणुकीत शिवसेनेच्या राजश्री राजेंद्र चौधरी बिनविरोध निवडून आल्या. तर उपमहापौरपदी लोकभारतीचे विनोद ठाकूर विजयी झाले. राष्ट्रवादी- काँग्रेस आघाडीचे अनिल विद्यार्थी यांना पराभूत केलं. शिवसेनेत फॉर्म भरताना बंडखोरी झाली होती. पण बंडखोरी केलेल्या वसुधा धनंजय बोडारे यांची सेना नेत्यांनी समजूत घातली. पण पुढच्या काळात शिवसेनेला इथे बंडखोरीचा सामना करावा लागणार याची झलकच या निवडणुकीच्या निमित्तानं पाहायला मिळाली.

close