पाणी कपात रद्द होईपर्यंत आंदोलन करणार – नितेश राणे

December 4, 2009 1:40 PM0 commentsViews: 5

4 डिसेंबरमुंबईतील पाणी कपात रद्द होत नाही तोपर्यंत स्वाभिमान संघटनेचे आंदोलन सुरुच राहणार असल्याचं नितेश राणे यांनी सांगितलं. पाण्याच्या प्रश्नाचं राजकारण करण्यापेक्षा ही समस्या सुटणं गरजेचं असल्याचंही त्यांनी सांगितलं. महानगरपालिकेवर काढलेला मोर्चा ही आंदोलनाची सुरुवात होती. यानंतर प्रत्येक वॉर्डात आणि ज्या ज्या ठिकाणी पाणी चोरी होत असेल त्या त्या ठिकाणी स्वाभिमानचे कार्यकर्ते आंदोलन करतील असंही त्यांनी सांगितलं. हिंमत असेल तर महानगरपालिकेतल्या सत्ताधारी सेना-भाजपाच्या नगरसेवकांनी आम्हाला अडवून दाखवावं असं आव्हानही त्यांनी दिलं आहे. 'स्वाभिमान' संघटनेने गुरुवारी मुंबई महानगरपालिकेवर मोर्चा काढला होता. यात नीरज ढोलकिया या कार्यकर्त्याचा मृत्यू झाला होता. तर पाच ते सहा जण जखमी झाले होते.