‘मोदींची तुलना हिटलरशी करणार्‍या महापौरांनी देशाची माफी मागावी’

July 21, 2015 6:53 PM0 commentsViews:

snehal ambekar34321 जुलै : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कामकाज हे हिटलरशाही सारखं आहे असं वक्तव्य करणार्‍या मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर यांना चांगलंच महागात पडताना दिसतंय. भाजप नगरसेवकांनी आज (सोमवारी) महापौर दालनाबाहेर ठिय्या आंदोलन सुरू केलंय.

महापौरांनी या वक्तव्याबाबत स्पष्टीकरण द्यावं नाही तर संपूर्ण भारतीयांची माफी मागावी अशी मागणी भाजपच्या नगरसेवकांनी केलीये. या देशातील जनतेनं नरेंद्र मोदींवर विश्वास दाखवला म्हणून ते पंतप्रधानपदी आहे. त्यांच्याबद्दल असं विधान करणं अत्यंत चुकीचं आहे. आम्ही सोमवारीही आंबेकर यांच्याकडे विचारणा केली होती. पण तरीही त्यांनी यावर उत्तर दिलं नाही म्हणून ठिय्या आंदोलन सुरू केलंय जोपर्यंत आंबेकर माफी मागत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहिल असंही नगरसेवकांनी स्पष्ट केलंय.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close