चिक्कीनंतर आता बिस्कीट खरेदीतही घोटाळा

July 21, 2015 7:47 PM1 commentViews:

biscuit scam_news21 जुलै : चिक्की घोटाळ्यामुळे नाचक्की झालेल्या फडणवीस सरकार आता आणखी अडचणीत येण्याची शक्यता आहे. महिला आणि बालकल्याण विभागातील आणखी एक घोटाळा समोर आला आहे आणि हा घोटाळा आहे बिस्कीट घोटाळा. महिला व बालकल्याण विभागाने चिक्की प्रमाणेच बिस्किटांची खरेदी केली गेली होती मात्र, खरेदी केलेल्या बिस्किटांच्या उत्पादनासाठी संबंधीत कंपनीला अन्न व औषध विभागाचा परवानाचं नसल्याची धक्कादायक बाबसमोर आली आहे.

एफडीएचा परवाना नसलेल्या पुण्याजवळील या गोवर्धन आयुरफार्मा या कंपनीला तब्बल 5 कोटींचं टेंडर देण्यात आलंय. हे टेंडर देत असतांनाही अनेक अनियमितता झाल्याची माहिती ही उघड झाली आहे. सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे या कंपनीकडून पुरविन्यात आलेली बिस्किट खान्यासाठी उपयुक्त आहेत की नाही याची कुठल्याही अधिकृत मानकाकडून प्रमाणित करण्यात आलं नाही. मात्र, हे सगळे आरोप होत असतांना या कंपनीच्या संचालिका भाग्यश्री चोंडे यांनी मात्र सर्व आरोप फेटाळले आहेत ,उलट एफडीए विभागामध्येच सावळा गोंधळ असल्याच चोंडे यांचं म्हणणं आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • Shankar Bhadange

    on that what supportive statement our C.M. WILL give we are waitng

close