‘स्वाभिमान’ चा काँग्रेसशी संबंध नाही- माणिकराव ठाकरे

December 4, 2009 1:42 PM0 commentsViews: 5

4 डिसेंबर स्वाभिमान संघटनेशी काँग्रेसचा काही संबध नाही, असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी म्हटलं आहे. काँग्रेसमध्ये असलेल्या लोकांनी आपली ताकद पक्ष वाढवण्यासाठी वापरावी, अशी टीकाही त्यांनी केली आहे. अशा प्रकारच्या संघटना बंद करण्यासाठी पक्षाला लवकरच धोरणात्मक निर्णय घ्यावे लागतील आणि ते घेण्यात येतील, असंही माणिकराव ठाकरेंनी म्हटलं आहे. गुरुवारी नारायण राणे यांचा मुलगा नितेश राणे यांच्या स्वाभिमान संघटनेने पाणी कपात रद्द करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेवर मोर्चा काढला होता. यात नीरज ढोलकिया याचा मृत्यू झाला होता.तर पाच जण जखमी झाले होते.

close