श्रीलंकेविरुद्ध भारताचा पहिल्या इनिंगमध्ये हायेस्ट स्कोअर

December 4, 2009 1:50 PM0 commentsViews: 3

4 डिसेंबरश्रीलंकेविरुध्द भारताने पहिल्या इनिंगमध्ये 726 रन्सचा डोंगर उभा करत टेस्ट क्रिकेटमधला भारताचा सर्वोच्च स्कोर केला. याबरोबरच पहिल्या इनिंगमध्ये श्रीलंकेवर 322 रन्सची मजबूत आघाडी घेतली आहे. कॅप्टन महेंद्रसिंग धोणीने शानदार सिक्स मारत आपली सेंच्युरी पूर्ण केली. त्यानंतर भारताची इनिंग घोषित केली. 2004 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुध्द भारताने एका इनिंगमध्ये 705 रन्सचा रेकॉर्ड केला होता. हाच रेकॉर्ड शुक्रवारी भारताने मोडला. मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर सेहवाग आणि सचिनचा रेकॉर्ड पाहण्याची संधी हुकली असली तरी क्रिकेटप्रेमींना भारतीय टीमचा हा रेकॉर्ड पहायला मिळाला. सेहवागची ट्रीपल सेंच्युरीची संधी फक्त 7 रन्सनं हुकली. तो 293 रन्सवर आऊट झाला. तर सचिन तेंडुलकरच्या टेस्टमधल्या 13 हजार रन्सचा रेकॉर्ड लांबणीवर पडला. सचिन 53 रन्सवर आऊट झाला. हा रेकॉर्ड पूर्ण करण्यासाठी सचिनला आणखी 30 रन्सची गरज आहे. मुरली विजय, राहुल द्रविड, सचिन तेंडुलकर आणि व्ही. व्ही. एस. लक्ष्मण या भारताच्या चार बॅट्समननी हाफ सेंच्युरी केल्या. श्रीलंकेतर्फे मुरलीधरनने सर्वाधिक 4 तर हेराथनं 3 विकेट घेतल्या. तिसर्‍या दिवस अखेर श्रीलंकेनं दुसर्‍या इनिंगमध्ये नाबाद 11 रन्स केले आहेत.

close