‘त्या’ लिखाणाबद्दल माफी मागितलीच नाही – संजय राऊत

December 5, 2009 10:43 AM0 commentsViews: 11

5 डिसेंबर परप्रांतीयांच्या विरोधातल्या लिखाणाबद्दल आपण माफी मागितलीच नसल्याचं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं आहे. परप्रांतियांच्या विरोधात दै. सामनातून लिखाण केल्यामुळे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्याविरोधात संसदेत हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल करण्यात आला होता. या प्रस्तावावर खुलासा करताना हक्कभंग समितीपुढे खासदार संजय राऊत यांनी खेद व्यक्त करत माफी मागितली होती. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मराठीचा मुद्दा हा मुळचा आपलाच असल्याचं शिवसेनेनं वारंवार सांगितलं.दै. सामनातूनही कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी मराठीच्या मुद्यावर लिखाणही केलं. त्यातच बिहारींच्या विरोधात अपमानजनक भाषा वापरली होती. त्यामुळे दुखावलेल्या काही उत्तर भारतीय खासदारांनी संसदेत राऊत यांच्याविरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव आणला. ज्यावेळी हक्कभंग समितीकडे हा प्रस्ताव चौकशीसाठी सोपवण्यात आला, त्यावेळी समितीने राऊतांकडे खुलासा मागितला. त्यावर या लिखाणाबद्दल राऊत यांनी खेद व्यक्त करत माफी मागितली. विरोधकांच्या हाती आयतं कोलीत दिलं. पण संजय राऊत यांनी या वृत्ताचा इन्कार करत आपण माफी मागितलीच नाही असा दावा केला आहे. खासदार संजय राऊतांच्या माफीमुळे मनसेच्या हाती शिवसेनेवर टीका करण्याचं एक शस्त्र मिळालं आहे.

close