गिलानींची नजरकैदेतून सुटका, मिळाला तात्पुरता पासपोर्ट

July 21, 2015 11:06 PM0 commentsViews:

gilani21 जुलै : फुटीरवादी हुरियत नेते सय्यद अली शाह गिलानी यांना सौदी अरेबियासाठीचा तात्पुरता पासपोर्ट देण्यात आलाय. गिलानी यांना त्यांच्या मुलीच्या लग्नासाठी सौदी अरेबियाला, जेद्दाला जायचं आहे. त्यासाठी त्यांना हा तात्पुरता पासपोर्ट देण्यात आलाय.

याआधी काश्मीरमध्ये आयसिस आणि पाकिस्तानचे झेंडे फडकावण्यात आले होते. त्यावरून काश्मीरमध्ये तणाव होता. काही ठिकाणी सुरक्षादलांवर दगडफेकीच्या घटनाही घडल्या. अशा प्रकारे दगडफेक करणार्‍यांना हुरियतची फूस होती, असा सुरक्षा दलांचा दावा होता. या घटनांच्या काळात सय्यद अली शाह गिलानी यांना नजगरकैदेत ठेवण्यात आलं. पण त्यांना आता सौदी अरेबियाचा पासपोर्ट देण्यात
आलाय.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close