कर्जमुक्ती नाही; मग काय? शिवसेनेचा मुख्यमंत्र्यांना सवाल

July 22, 2015 9:44 AM0 commentsViews:

uddhav and devendra

22 जुलै : पावसाळी अधिवेशनात शेतकर्‍यांना कर्जमाफी न देण्याच्या निर्णयावरून एकीकडे विरोधकांनी रान उठवलं असताना दुसरीकडे सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेनेही मुख्यमंत्र्यांना खडे बोल सुनावले आहेत. कणा मोडलेल्या लाखो शेतकर्‍यांचं जीवन कसं उभं करणार, याचा खुलासा करण्याचं आव्हान करत शिवसेनेने आपलं मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून ‘कर्जमुक्ती नाही, मग काय?’ असा सवालही उपस्थित केला आहे.

मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफी होणार नाही असं सांगितलं आहे. मुळात कर्जमाफी नको तर संपूर्ण कर्जमुक्ती व्हायलाच हवी अशी मागणी ‘सामना’मधून करण्यात आली आहे. त्यामुळे विरोधकांसोबतच सत्तेतल्या शिवसेनेनंही कर्जमुक्तीची भाषा बोलल्यानं भाजपची कोंडी झाली आहे.

काय म्हटलं आहे ‘सामना’च्या अग्रलेखात?
शेतकर्‍यांना संपूर्ण कर्जमाफीची मागणी मुख्यमंत्री फडणवीस यांनी फेटाळून लावली. मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफी नव्हे तर व्याजमाफी मिळेल असे बजावले आहे. कर्जमाफी करणार नाही ही मुख्यमंत्र्यांची भूमिका. कणखर वगैरे असल्याचे म्हटले गेले आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी कर्जमाफी फेटाळण्याचा निर्णय ‘कणखर’पणे घेतला असेल तर कणा मोडून पडलेल्या लाखो शेतकर्‍यांचे जीवन ते कसे उभे करणार, याचा खुलासा व्हायला हवा. मुळात कर्जमाफी हा शब्द आम्हाला मान्य नाही. संपूर्ण कर्जमुक्ती ही आमची मागणी आहे. राज्याची आर्थिक घडी विस्कटून जावी व महाराष्ट्र कर्जाच्या ओझ्याने कोलमडून जावा असे आम्हालाही वाटत नाही. शेतकरी वाचावा हीच आमची हाक आहे, मग तुम्ही काय करायचे ते पहा.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close