कोळसा घोटाळ्यातील आरोपीच्या पासपोर्टसाठी काँग्रेसचा होता दबाव – सुषमा स्वराज

July 22, 2015 11:14 AM0 commentsViews:

271662-sushma

22 जुलै : ललित मोदी प्रकरणावरून विरोधकांचा आक्रमक पवित्रा बघता सुषमा स्वराजांनीही पलटवार केला आहे. कोळसा घोटाळ्यातील आरोपी संतोष बगरोदिया याला पासपोर्ट मिळवून देण्यासाठी काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याकडून माझ्यावर दबाव आणण्यात येत होता, असा गौप्यस्फोट केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज यांनी केला आहे. स्वराज यांनी आज (बुधवारी) सकाळी ट्विटरवरून यासंबंधी माहिती दिली. ‘मी आज सभागृहात त्या काँग्रेस नेत्याचं नाव जाहीर करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सोमवारी सुरुवात झाली आणि पहिल्याच दिवशी विरोधकांनी सुषमा स्वराज आणि वसुंधरा राजे यांच्या राजीमानाम्याची आग्रही मागणी केली होती. त्याला सुषमा स्वराज यांनी ट्विटरव्दारे विरोधकांना प्रत्युत्तर दिलं. ‘कोळसा घोटाळ्यातील आरोपी संतोष बगरोदिया यांना पासपोर्ट मिळवून देण्यासाठी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्याने दबाव टाकला होता, या नेत्यांचे नाव संसदेत जाहीर करु’ असा गौप्यस्फोट सुषमा स्वराज यांनी केला आहे.

दरम्यान, सुषमा स्वराज यांच्या ट्विटमुळे खळबळ माजली असून आज सभागृहात सुषमा स्वराज काय बोलणार, याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

 

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close