काळबादेवी अग्निकांडातील शहीदांना शौर्यपदक?

July 22, 2015 11:43 AM0 commentsViews:

kalbadevi fire sanjay rane and mahendra desai22 जुलै : काळबादेवीतील अग्निकांडात मृत्यु पावलेल्या अग्निशमन दलाच्या अधिकार्‍यांना शौर्य पदक देण्याबाबत राष्ट्रपतींकडे प्रस्ताव दिला असल्याची माहिती गृहराज्यमंत्री रणजीत पाटील यांनी विधानपरिषदेत दिली.

काळबादेवी आग दुर्घटनेत मुंबई अग्निशमन दलानं चार जिगरबाज अधिकारी गमावले. एका आगीच्या घटनेत चार मोठे अधिकारी गमावण्याचा हा पहिलीच घटना आहे. वीरमरण आलेल्या अग्निशमन दलाच्या अधिकार्‍यांना शहीद दर्जा देण्याबाबत सहानुभूतीपूर्वक विचार सुरू असून शौर्य पदक देण्यासाठी राष्ट्रपतींकडे प्रस्ताव दिला आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close