मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू संजय देशमुख राज ठाकरेंच्या भेटीला

July 22, 2015 2:42 PM0 commentsViews:

sarewas

22 जुलै : मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.संजय देशमुख यांनी आज (बुधवारी) सकाळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या कृष्णकुंज या निवासस्थानी भेट घेतली. देशमुख यांच्या ‘राज’भेटीमुळे विविध तर्क लढवले जात आहेत. मात्र, या भेटीतून कोणता वेगळा निष्कर्ष काढू नये असं देशमुख यांनी यावेळी सांगितलं.

या भेटीकडे राजकीय भेट म्हणून पाहू नये फक्त राज यांचीच नव्हे तर येत्या काळात उद्धव ठाकरेंसह राजकीय, उद्योगपती आणि सामाजिक क्षेत्रातील अनेकांची भेट घेणार असल्याचंही ते पुढे म्हणाले.  देशमुख यांची गेल्याच महिन्यात मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूपदी निवड झाली.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close