वादग्रस्त बिल्डर अविनाश भोसले यांच्या कार्यक्रमाला मात्तबर नेत्यांची उपस्थिती

December 5, 2009 10:50 AM0 commentsViews: 42

5 डिसेंबर पुण्यातले वादग्रस्त बिल्डर अविनाश भोसले यांच्या कार्यक्रमाला राज्यातल्या अनेक ज्येष्ठ नेत्यांनी हजेरी लावली. पुण्यातल्या कोरेगाव पार्क इथे भोसलेंनी 'द वेस्टीन' नावाचं हॉटेल सुरू केलं. या हॉटेलच्या उद्घाटनासाठी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार, ऊर्जामंत्री सुशीलकुमार शिंदे, अवजड उद्योगमंत्री विलासराव देशमुख आणि राज्याचे वनमंत्री पतंगराव कदम उपस्थित होते. दोन वर्षांपूर्वी कस्टम ड्यूटी चुकवल्याबद्दल अविनाश भोसलेंना मुंबई विमानतळावर अटक झाली होती. कृष्णा खोरे प्रकल्पाचा कंत्राटदार म्हणूनही त्यांची भूमिका वादग्रस्त होती.

close