खाजगी कोचिंग क्लासेसवर यापुढे राज्य सरकारचे नियंत्रण -तावडे

July 22, 2015 5:05 PM1 commentViews:

tawade on pvt classes22 जुलै : राज्य सरकारने आता खाजगी कोचिंग क्लासेसविरोधात मोहीम उघडलीये. खाजगी कोचिंग क्लासेसवर यापुढे सरकारचं नियंत्रण येणार आहे अशी माहिती शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिलीये. तसंच खाजगी कोचिंग क्लासेसच्या जाहिराती, फी आणि दर्जावरही राज्य सरकारचं नियंत्रण असणार आहे असंही तावडेंनी सांगितलं.

दप्तराचं ओझं कमी करण्यासाठी नेमण्यात आलेल्या समितीने दिलेला अहवाल आज (बुधवारी) विधानसभेत मांडण्यात आला. त्यानुसार मुलांच्या वह्यांच्या पानांची संख्या, वह्यांची पुस्तकांची संख्या कमी करण्यावर भर दिलाय. टॅब बाबत विचार सुरू आहे. पण अजून अहवाल यायचा आहे अशी माहितीही तावडे यांनी दिली. यापुढे खाजगी कोचिंग क्लासेसला नियंत्रित करण्यासाठी शिक्षण विभागाच्या अंतर्गत त्याची नोंदणी केली जाणार आहे. क्लासेसच्या जाहिरातींवर नियंत्रण आणले जाईल. त्यांच्या शिक्षणाचा दर्जा आणि फी यावरही सरकारचं नियंत्रण असेल असंही तावडे यांनी सांगितलंय. राज्यभरात खाजगी कोचिंग क्लासेसची मोठी संख्या आहे. अनेक क्लासेसकडून विद्यार्थ्यांकडून भरघोस फी लाटली जात असते. त्यामुळे आता राज्य सरकारच्या निर्णयामुळे खाजगी क्लासेसला लगाम लागण्याची शक्यता आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • vikas chaware

    it is good decission taken by tawadeji

close