चिंचवडमध्ये दोन मांडूळ तस्करांना अटक

July 22, 2015 6:06 PM0 commentsViews:

mandul_chinchvad322 जुलै : मांडूळाची तस्करी करण्यासाठी चिंचवडमध्ये आलेल्या दोन तस्करांना पोलिसांनी अटक केलीये. सोमवारी रात्री वाल्हेकरवाडी परिसरात चिंचवड पोलिसांनी ही कारवाई केली. स्वप्नील मुरलीधर माने आणि नवनाथ किसन ठाकर अशी अटक करण्यात आलेल्या तस्करांची नावं आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री दोन तरुण मांडूळाची तस्करी करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावला आणि कापडी पिशवी घेऊन फिरणार्‍या दोन संशयित तरुणांना अटक केली. त्यांच्याकडे झडती घेतली असता पिशव्यांमध्ये दोन जिवंत मांडूळ आढळून आले. पोलिसी खाक्या दाखवताच 4 लाख रुपयांना मांडूळांची तस्करी करणार असल्याचे त्यांनी कबूल केले. पुढील तपास चिंचवड पोलीस करत आहेत.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close