OMG!, शिर्डीत पाच मंदिरांचे कळस होणार सोनेरी !

July 22, 2015 6:23 PM0 commentsViews:

shrdi22 जुलै : शिर्डीमध्ये साईंच्या परिसरातील 5 मंदिरांचे कळस सोनेरी होणार आहे. शिर्डीमधल्या साई समाधी मंदिराला सोन्याचा कळस आहे. आता या मंदिर परिसरातल्या आणखी 5 मंदिरांच्या कळसांना सोन्याचा लेप देण्याचं काम सुरू आहे. हैदराबादमधल्या साईभक्ताच्या देणगीतून कळसांना सोनं चढवलं जातंय. येत्या गुरू पौर्णिमा उत्सवापर्यंत हे काम पूर्ण होणार आहे.

गेल्या काही वर्षांपासून साईबाबांच्या दानपेटीत जमा होणार्‍या संपत्तीमध्ये वाढ होतेय. हैदराबादमधल्या एका साईभक्तानं मंदिर परिसरातल्या पाच मंदिरांच्या कळसांना सूवर्ण लेप देण्याची इच्छा व्यक्त केली. त्याला प्रशासनानं मान्यता दिल्यानंतर आता प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे. गणेश मंदिर, शनी मंदिर, महादेव मंदिर तसंच गुरुस्थान आणि नंदादीप या पाच मंदिरांच्या कळसाला सोन्याचा मुलामा दिला जातोय.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close