भुजबळ प्रकरणाची सखोल चौकशी करा, कोर्टाने एसीबीला खडसावले

July 22, 2015 7:04 PM0 commentsViews:

bhujbal_ant_courpation22 जुलै : बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्यासमोरच्या अडचणी कमी होण्याची चिन्हं दिसत नाहीत. या प्रकरणातील 4 प्रकरणांमध्ये पुरावे सापडले नसल्याची कबुली अँटी करप्शन ब्युरोने हायकोर्टात दिली खरी पण, भुजबळांच्या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करा अशा शब्दात हायकोर्टाने अँटी करप्शन ब्युरोला खडसावलंय.

भुजबळ यांच्या बेहिशेबी मालमत्तांच्या 9 प्रकरणांची चौकशी सुरू आहे. हायकोर्टाच्या आदेशानुसार त्याच्या तपासाची माहिती देण्यासाठी अँटी करप्शन ब्युरोनं आज (बुधवारी) एका महिन्यानंतर हायकोर्टात अहवाल सादर केला. 4 प्रकरणांमध्ये पुरावे सापडत नसल्याचं एसीबीनं आज हायकोर्टात सांगितलं. मात्र, पुरावे सापडत नसतील तर आणखी सखोल चौकशी करा अशा शब्दांमध्ये हायकोर्टाने एसीबीला खडसावलं. भुजबळांची चारही प्रकरण आता बंद होणार नाही. त्यामुळे सर्व 9 प्रकरणांची चौकशी यापुढेही सुरू राहणार आहे. भुजबळांच्या बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी एसीबीने मुंबई, नाशिक आणि पुण्यातील घरी, कार्यालयांवर छापे टाकले होते.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close