कसाब देशातला सर्वात सुरक्षित माणूस : अमिताभची ब्लॉगमध्ये टीका

December 5, 2009 10:58 AM0 commentsViews: 1

5 डिसेंबर कसाब हा देशातील सर्वाधिक सुरक्षित माणूस आहे, असं अमिताभ बच्चन यांनी उद्वेगानं आपल्या ब्लॉगमध्ये लिहिलं आहे. 26 नोव्हेंबरच्या निमित्ताने बिग बी अमिताभ बच्चन यांनी ब्लॉगवरून याबाबतचा संताप व्यक्त केला आहे. डोळ्यासमोर सुरु असलेलं मृत्यूचं तांडव आपण वर्षभरापूर्वी अगतिकतेनं बघितलं. तीच अगतिकता आपण अजूनही अनुभवत आहोत, असंही बिग बीने म्हटलं आहे. त्यांच्या या वाक्याने भारताच्या सुरक्षा व्यवस्थेवरचं प्रश्नचिन्हच त्यांनी उभं केलं आहे. कसाबला मिळणार्‍या सुरक्षा व्यवस्थेवरही हे भाष्य आहे. तर कसाब हा एकमेव जिवंत अतिरेकी असल्याने त्याची काळजी घेणं गरजेचं असल्याचं मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे.

close