कुलगुरूंची ‘राज’भेट विद्यापीठ कायद्याचा भंग ?

July 22, 2015 10:15 PM0 commentsViews:

SANJAY DESHMIKH meet raj22 जुलै : मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय देशमुख पदभार स्वीकारताच वादात सापडले आहे. संजय देशमुख यांनी आज (बुधवारी) मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंची त्यांच्या निवासस्थानी ‘कृष्णकुंज’वर जाऊन भेट घेतली. देशमुख यांना राज ठाकरेंची भेट महागात पडण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऍक्ट कलम 12, (13)(ई) नुसार कोणत्याही विद्यापीठाचा कुलगुरू हा स्वतःहून कोणत्याही राजकीय नेत्याला भेटू
शकत नाही अथवा कोणत्याही राजकीय पक्षाशी सलग्न असू शकत नाही. तरीही संजय देशमुखांनी आज राज ठाकरेंची त्यांच्या घरी जाऊन भेट घेऊन एकप्रकारे विद्यापीठ कायद्याचा भंगच केलाय. त्यांच्यावर कारवाई देखील होऊ शकते. म्हणूनच कुलगुरूंच्या या अशोभनीय कृतीबद्दल सरकार त्यांच्यावर कारवाई करणार का हेच बघायचं आहे. दरम्यान, सगळ्यांना सोबत घेऊन आपण पुढे गेलं पाहिजे. त्यामुळे कोण कोणत्या राजकीय पक्षाचा आहे याचा विचार न करता आपल्या विद्यापीठाला पुढे नेण्यात सहकार्य करेल याचा विचार करावा. अशा लोकांची मला मदत हवी आहे. या भेटीतून कुणीही वेगळा निष्कर्ष काढू नये असं स्पष्टीकरण संजय देशमुख केलंय.

कुलगुरूंची नियुक्ती कधी रद्द होऊ शकते?

– एखाद्या राजकीय पक्षाचा सदस्य असल्यास किंवा त्याच्याशी संबंध असल्यास
– राजकीय पक्षाशी संबधित संघटनेशी संबंध किंवा सदस्य असल्यास
– एखाद्या राजकीय चळवळीत किंवा उपक्रमात सहभाग असल्यास
– याप्रकरणी राज्यपालांचा निर्णय अंतिम असेल
– कारवाईपूर्वी राज्यपाल संबंधित कुलगुरूंना बाजू मांडण्याची संधी देतील

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close