आजपासून एक्स्प्रेस-वेवर दुरुस्तीचं काम

July 23, 2015 8:28 AM0 commentsViews:

1437373765687_Mumbai-PuneExpressway

23 जुलै : दरड कोसळण्याच्या संकटाची पुनरावृत्ती रोखण्यासाठी आजपासून ‘एक्स्प्रेस वे’वर दुरुस्तीचं काम सुरू होतं आहे. या कामामुळे वाहतूक संथ गतीने सुरू ठेवण्यात येणार आहे. कारसारख्या छोट्या वाहनांना घाटमध्यावरून जुन्या घाटातून खोपोली मार्गे वाहतूक करावी लागणार आहे. सकाळी 10 ते दुपारी 5 वजेपर्यंत हे काम सुरू असणार आहे.

आडोशी बोगद्याजवळील एक लेन पुणे आणि मुंबईकडे जाणार्‍या ज़ड वाहनांसाठी आलटून-पालटून खुली केली जाणार आहे. दरडप्रवण क्षेत्रातील सैल झालेले खडक फोडून काढणे, धोकादायक ठिकाणी जाळ्या बसवणं, महामार्गावर पडणारी दरड साफ करणं, यासरखी कामं या दहा दिवसांत पुर्ण केली जाणार आहेत.

गेल्या महिनाभराच्या काळात एक्स्प्रेस वेवर बोरघाटामध्ये दरडी कोसळून जीवघेणे अपघात झाले आहेत. भरमसाठ टोल भरून किमान सुविधा आणि सुरक्षा पुरवली जात नसल्याबद्दल नागरिकांकडून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली.

दरम्यान, दरड कोसळल्या प्रकरणाची चौकशी करणार असल्याची माहितीही एकनाथ शिंदे यांनी दिली. चौकशीअंती काय आणि कोणावर कारवाई हा निर्णय घेणार असल्याचंही शिंदेनी स्पष्ट केलं. आयआरबीनं नुकसानभरपाई द्यावी या विरोधकांच्या मागणीवर चौकशीअंती निर्णय घेऊ असंही शिंदे म्हणाले.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close