सेंट जॉर्जमधले व्हेंटीलेटर नादुरुस्त : दोन दिवसांत 5 पेशंट्स मृत्युमुखी

December 5, 2009 2:10 PM0 commentsViews: 4

5 डिसेंबर मुंबईच्या सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये आयसीयूतले पाचपैकी चार व्हेंटीलेटर नादुरूस्त झाल्याने पाच पेशंट्सना आपला जीव गमवावा लागल्याचा आरोप होत आहे. व्हेंटीलेटर नादुरूस्त असल्याने गुरूवारी तीन आणि शुक्रवारी दोन गंभीर पेशंट्सवर उपचार करता आले नाही. त्यामुळे त्यांना जीव गमवावा लागला असा हॉस्पिटलवर आरोप होत आहे. व्हेंटिलेटर अनेक महिन्यांपासून नादुरूस्त असल्याची कबुली हॉस्पिटलचे मेडिकल सुप्रीटेंडंट सी.जी. गायकवाड यांनी दिली. गेल्या तीन वर्षांपासून व्हेंटिलेटर बाबत तक्रार असल्याची माहितीही गायकवाड यांनी दिली. व्हेंटिलेटरच्या दुरूस्तीसाठी अडीच लाख रुपये खर्च येणार असल्याने त्यासंबंधातला प्रस्ताव हॉस्पिटल प्रशासनाने राज्य सरकारला सात ऑक्टोबरलाच पाठवला आहे. पण त्यावर सरकारकडून कोणताही निर्णय घेण्यात आला नसल्याचंही गायकवाड यांनी सांगितलं. व्हेंटीलेटर नादुरुस्त झाल्याने पेशंट्सचा मृत्यू झाल्याचा आरोप मात्र हॉस्पिटल प्रशासनाने फेटाळला आहे.

close