महालक्ष्मी मूर्तीच्या रासायनिक प्रक्रियेवरुन वादंग

July 23, 2015 9:45 PM0 commentsViews:

kolhapur mahalaxmi423 जुलै : कोल्हापूरमध्ये सध्या महालक्ष्मी देवीच्या मूळ मूर्तीवर रासायनिक प्रक्रियेबद्दल संभ्रम निर्माण झालाय. हिंदू जनजागृती समितीनं आक्षेप घेत थेट पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि पुरातत्व खात्याच्या दिल्लीतल्या अधिकार्‍यांना एक पत्र पाठवलंय. या पत्रात मूर्ती बदलण्याची गरज असून मूळ मूर्तीवर वज्रलेप केल्यानं मूर्तीचं पावित्र्य राखलं जाणार नाही, असा आरोप करण्यात आलाय. तर दुसरीकडे औरंगाबादचं पुरातत्व खात्याचं पथक अजूनही कोल्हापूरमध्ये दाखल झालेलं नाही.

अनेक वर्षं या रासायनिक प्रक्रियेचा वाद होता. पण न्यायालयीनं आदेशानुसार पुरातत्व खात्याच्या देखरेखीखाली हे रासायनिक संवर्धन करण्याचा निर्णय देण्यात आलाय. पण हिंदू जनजागृतीच्या आक्षेपामुळंच पुरातत्वचं पथक आलेलं नाही, अशीही चर्चा सध्या कोल्हापूरमध्ये आहे. तर दुसरीकडे श्रीपूजक संवर्धनावर आजही ठाम असून आज (गुरुवारी) सकाळपासूनच मूळ मूर्तीचं दर्शन बंद करण्यात आलंय.

खासदार धनंजय महाडिक यांनीही दिल्लीत पुरातत्व खात्याचे महासंचालक डॉ. राकेश तिवारी यांची भेट घेतली. न्यायालयीन आदेश आणि पूर्वनियोजित आराखड्यानुसार देवीच्या मूर्तीवर रासायनिक प्रक्रिया करावी, त्याला उशीर करू नये, अशी मागणी महाडिक यांनी केली. त्यावर शुक्रवारी हे काम सुरू होईल, अशी ग्वाही महासंचालकांनी दिल्याचं धनंजय महाडिक यांनी त्यांच्या निवेदनात सांगितलंय.

तर पुरातत्व खात्याचं पथक उद्या सकाळपर्यंत आलं तर रासायनिक प्रक्रीयेचं काम सुरु करणार, पथक नाही आलं तर बैठक घेऊन पुढील निर्णय घेणार अशी माहिती जिल्हाधिकार्‍यांनी दिलीये.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close