एमएमआरडीएच्या भोंगळ कारभाराची चौकशी करणार – मुख्यमंत्री

December 5, 2009 2:12 PM0 commentsViews: 2

5 डिसेंबर एमएमआरडीच्या भोंगळ कारभाराची चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी दिले आहेत. शनिवारी मुख्यमंत्री स्वत: वांद्रे इथल्या एमएमआरडीएच्या ऑफिसमध्ये आले होते. प्रकल्पग्रस्तांचं पुनर्वसन करण्यासाठी बांधण्यात आलेल्या बिल्डिंग्जमध्ये एमएमआरडीएच्या अधिकार्‍यांनी भलत्याच लोकांचं पुनर्वसन केल्याची सीरिजच आयबीएन लोकमतने पुराव्यांसह पाच दिवसांपासून चालवली होती. यानंतर या प्रकरणाची चौकशी करण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं.

close