लिबरहान आयोगाच्या अहवालावर लोकसभेत चर्चा

December 7, 2009 6:53 AM0 commentsViews: 2

7 डिसेंबर बाबरी मशीद विध्वंसप्रकरणी स्थापन करण्यात आलेल्या लिबरहान आयोगाच्या अहवालावर सोमवारी आणि मंगळवारी संसदेत चर्चा होणार आहे. संसदेत मांडला जाण्यापूर्वीच अहवाल फुटल्यामुळे सरकारला तातडीने हा अहवाल मांडावा लागला. त्यामुळे अधिवेशन सुरू होताच सरकारने घाईघाईत मूळच्या इंग्रजी मसुद्यासहच हा अहवाल संसदेच्या पटलावर ठेवला. त्यानंतर लोकसभा आणि राज्यसभेतही मोठा गोंधळ झाला होता. भाजपच्या अनेक नेत्यांबरोबरच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि अनेक हिंदुत्त्ववादी नेत्यांवर लिबरहान आयोगाने ठपका ठेवला आहे. वाजपेयींसारखे नेते शक्य असूनही ही घटना थांबवू शकले नाही, असंही आयोगाने म्हटलं आहे. मात्र ऍक्शन टेकन रिपोर्टमध्ये प्रत्यक्षात एकाही नेत्याचं नाव नव्हतं. त्यामुळेच सोमवारी यावर काय चर्चा होते, भाजप आणि समाजवादी पार्टी कोणती भूमिका घेतात याकडे सगळ्यांचं लक्ष आहे.

close