लातूर-नांदेड रस्त्यावर भीषण अपघात, 10 ठार

July 24, 2015 9:38 AM0 commentsViews:

nanded accident

24 जुलै  : लातूरच्या नांदेड रस्त्यावर आज सकाळी एक भीषण अपघात झाला असून यामध्ये 10 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे.

चाकूर जवळील ब्रम्हवाडी पाटीजवळ ट्रक आणि क्रूजरची समोरासमोर धडक झाली. या अपघातात ट्रकच्या धडकेत क्रूजरचा अक्षरश: चक्काचूर झाला. अपघात इतका भीषण होता की यावेळी क्रूजर गाडीतून प्रवास करणार्‍या 10 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला तर 3 प्रवासी गंभीर रित्या जखमी झाले आहेत.

जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू असुन अपघाताची तीव्रता पाहता बळींचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close