विधिमंडळात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये पुन्हा खडाजंगी

July 24, 2015 1:23 PM2 commentsViews:

Vidhimandal1

24 जुलै : विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात आज (शुक्रवारी) सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात पुन्हा एकदा चांगलीच जुंपली. ज्या मंत्र्यांवर आरोप आहेत, त्यांनी आधी राजीनामा द्यावा, अशी मागणी विरोधकांनी लावून धरल्यानंतर मुख्यमंत्री आणि विनोद तावडे यांनी विरोधकांना खडे बोल सुनावले.

विनोद तावडे यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि जयंत पाटील यांच्यावर चांगलेच संतापले. माझ्यासारख्या गरीब घराचा मुलगा शिकतो. माझे वडिल क्लार्क होते. माझ्या वडिलांकडे पृथ्वीराज चव्हाण, जयंत पाटील यांच्या वडिलांइतके पैसे असते, तर मी पण विदेशात जाऊन शिकलो असतो. पण तुम्ही गरीब विद्यार्थ्यांची थट्टा करू नका”, असं भावनिक उत्तर तावडेंनी दिलं. तावडेंना उत्तर देताना राष्ट्रवादी नेते जयंत पाटील म्हणाले,”हा मुद्दा पैशाचा नाही, तर बोगस डिग्रीचा आहे. तसंच भ्रष्टाचाराचे आरोप असताना पदावर राहणं योग्य नाही. या मंत्र्यांना सत्ता सोडवत नाही, त्यामुळे होणार्‍या चौकशीवर आमचा विश्वास नाही, असंही जयंत पाटील म्हणाले.

विरोधकांचा हा पवित्रा पाहून, मुख्यमंत्र्यांसह सत्ताधारी आमदारही आक्रमक झाले. ‘ज्यांच्यावर आरोपांची राळ उठली आहे, ते आमच्यावर आरोप करत आहेत. यांच्या आरोपांची चौकशी झाली, तर काँग्रेस-राष्ट्रवादीचे निम्मे आमदार सभागृहाबाहेर जातील. त्यामुळे घोटाळेबाजांनी आम्हाला शिकवू नये’, असं उत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना दिलं. आमचं सरकार पारदर्शी आहे. त्यामुळे विरोधकांच्या केवळ आरोपांनी राजीनामा देण्याचा प्रश्नच नाही. विरोधक आरोप करतात म्हणून आम्ही राजीनामा देऊ ही त्यांची भाबडी आशा आहे’, असंही फडणवीस यांनी सांगितलं.

दरम्यान, राज्य विधिमंडळ अधिवेशनाचा आजच्या दिवसची सुरुवात गदारोळानंच झाली. विरोधकांनी विधानभवनाच्या पायर्‍यांवर पंकु चिक्की विकली तर सभागृहाच्या आत भ्रष्ट नेत्यांवर कारवाई करण्याची मागणी करत विरोधकांनी घोषणाबाजी केली.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • rahul

    pankaja Munde yancha Evdha dhaska ka ghetala ahe virodhakani?

  • SUNIL SHINDE

    GARIB VIDYARTHI HEY PRAMANIK ASTAT TUMHI TAR KHOTRARDE AHAHAT VADILANI HECH SHIKVALE

close