कॉ. पानसरेंचे मारेकरी सापडलेत, पण सरकार जाहीर करत नाही- हसन मुश्रीफ

July 24, 2015 1:59 PM0 commentsViews:

pansare new

24 जुलै : कॉम्रेड गोविंद पानसरे यांचे मारेकरी सापडले आहेत पण राज्य सरकार त्यांची नावं जाहीर करत नाहीय, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हसन मुश्रीफ यांनी आज (शुक्रवारी) केला.

पानसरे यांचे मारेकरी सापडले असल्याचे मला एसआयटीच्या एका जबाबदार अधिकार्‍यानेच सांगितले आहे. पण सरकार त्यांची नावं जाहीर करायला घाबरत आहे. मी यासंबंधी विधीमंडळातही आवाज उठवणार असल्याचं मुश्रीफ म्हणाले. तर ‘पानसरे यांच्या मारेकर्‍यांची नावं जाहीर न करण्यात सरकारचं काही षड्‌यंत्र तर नाही ना, हे बघावं लागेल, असं कॉ. पानसरे यांची मुलगी स्मिता पानसरे यांनी म्हटलं. सरकारनं इच्छाशक्ती दाखवावी, अशी आवाहन त्यांनी केलं.  पानसरे यांच्या हत्येला पाच महिने पूर्ण झाले असून आज मुश्रीफ यांच्या विधानामुळे आरोपींबाबतची चर्चा पुन्हा ऐरणीवर आली आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close