पंतप्रधान रशियाच्या दौर्‍यावर

December 7, 2009 10:00 AM0 commentsViews: 3

7 डिसेंबर पंतप्रधान मनमोहनसिंग सध्या रशियाच्या दौर्‍यावर आहेत. या दौर्‍यात भारत-रशिया नागरी-अणुसहकार्य करार होण्याची शक्यता आहे. भारत-अमेरिके यांच्या दरम्यान झालेल्या, अणुसहकार्य करारापेक्षाही हा करार भारताला जास्त फायदेशीर असल्याचं सांगण्यात येतंय. हा करार अंतिम टप्प्यात असल्याचंही सांगण्यात येतं आहे. करारानुसार रशियाकडून भारताला आण्विक तंत्रज्ञानही मिळणार आहे. तसंच रशियाकडून भारताला युरेनियमचा पुरवठाही करण्यात येईल.

close