26/11च्या खटल्याचा निकाल लवकरच – उज्ज्वल निकम

December 7, 2009 10:03 AM0 commentsViews: 2

7 डिसेंबर मुंबई हल्ल्याच्या खटल्याचा निकाल लवकरात लवकर लागावा यासाठी या खटल्याबद्दलचे सगळे पुरावे आठवड्याभरात सादर करू, अशी माहिती विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी दिली आहे. या खटल्यात आता फक्त 35 साक्षादारांची तपासणी बाकी राहिल्याचंही निकम यांनी सांगितलं. त्यांच्यापैकी काही जणांचे प्रतिज्ञापत्र कोर्टात सादर केलं जाईल. तर काही जणांची उलटतपासणी करण्यात येईल, असंही ते म्हणाले. अंतिम निकाल देण्यापूर्वी कोर्ट दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकून घेईल, अशी माहिती निकम यांनी दिली.

close