राहुल गांधी माफी मागा, नाहीतर बदनामीचा खटला दाखल करू -गडकरी

July 24, 2015 5:56 PM0 commentsViews:

gadkari on rahul gandhi4324 जुलै : ललितगेट प्रकरणात सुषमा स्वराज यांच्यावर काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी टीका केल्यामुळे भाजप नेते नितीन गडकरींनी संताप व्यक्त केलाय. आम्ही राहुल गांधी यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा ठोकायचा विचार करतोय, असा इशाराच नितीन गडकरींनी दिलाय.

सुषमा स्वराज यांनी ललित मोदींबाबत गुन्हेगारी कृत्य केलंय, अशी टीका राहुल गांधींनी केली होती. अगोदरच स्वराज यांच्या राजीनाम्यासाठी विरोधकांनी भाजपला धारेवर धरलंय. त्यातच राहुल गांधींच्या टीकेमुळे नितीन गडकरी चांगलेच भडकले. राहुल गांधींनी सुषमा स्वराज यांच्याबद्दल केलेलं विधान चुकीचं आहे. त्यांनी असं बोलायला नको होतं. यामुळे ते बालिशपणाचं राजकारण करताय हे आता सिद्ध झालं अशी बोचरी टीका गडकरींनी केली. राहुल गांधींनी एकाप्रकारे परराष्ट्रमंत्र्यांचा अपमान केलाय. त्यांनी देशातील जनतेची माफी मागावी अन्यथा आम्ही राहुल यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा ठोकायचा विचार करतोय, असा इशारा गडकरींनी दिलाय. राहुल गांधींनी स्वत: पुढे येऊन स्वराज यांची माफी मागावी नाहीतर कायदेशीर कारवाईला सामोरं जावं लागेलं असंही गडकरींनी स्पष्ट केलं.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close