एफबीआयची टीम भारतात दाखल

December 7, 2009 10:08 AM0 commentsViews: 3

7 डिसेंबर एफबीआयची टीम सध्या भारतात आली आहे. 26/11 च्या मुंबई हल्ल्यातील चौकशीमध्ये डेव्हिड हेडलीचं नाव पुढे आलं होतं. डेव्हिडच्या भारत भेटीत राहुल भटशी त्याची झालेली ओळख या सगळ्यांची माहिती एफबीआयची टीम घेणार आहे. अमेरिकेतील संशयित दहशतवादी डेविड हेडली आणि पाकिस्तानी वंशाचा कॅनेडियन तहाव्वूर राणा यांच्या संबंधाविषयी भारताकडून माहितीचं आदानप्रदान केलं जाईल. हेडलीचे पुण्यातील वास्तव्य उघड झाल्याने ही टीम पुण्यातही भेट देण्याची शक्यता आहे.

close