…क्राईम रेकॉर्डच्या आधारे उत्तर, कृषिमंत्र्यांची सारवासारव

July 24, 2015 10:34 PM0 commentsViews:

24 जुलै : शेतकर्‍यांच्या जखमेवर मिठ चोळल्यानंतर केद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंह यांनी सारवासारव केलीये. राष्ट्रीय क्राईम रेकॉर्ड ब्युरोकडून मिळालेल्या माहितीवरच राज्यसभेत उत्तर दिलं असा दावा राधामोहन सिंह यांनी केलाय. तसंच मला ही आकडेवारी राज्य सरकारांकडून मिळाली असंही सिंह म्हणाले.radhamohan singh_news32

‘शेतकर्‍यांच्या आत्महत्या या व्यसनाधीनता आणि प्रेमप्रकरणामुळे होत आहेत’ असं अजब आणि संतापजनक लेखी उत्तर केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंह यांनी राज्यसभेत दिल्यामुळे एकच टीकेची लाट उठली. राधामोहन सिंह यांचं उत्तर असंवेदनशील आणि शेतकर्‍यांची क्रूर चेष्टा करणारं आहे अशी त्यांच्यावर जोरदार टीका झाली. सिंह आपल्या उत्तरात म्हणतात, “हुंडाबळी, पडिक जमीन, बेरोजगारी, कौटुंबिक वाद, व्यसनाधीनता आणि प्रेमप्रकरणं ही आत्महत्येची कारणं आहेत. कर्जबाजारीपणा, नापिकी, पाऊस न होणे हीदेखील आत्महत्यांमागची कारणं आहेत.”

सिंह यांच्या या उत्तरामुळे विरोधकांनी जोरदार टीका केली. आपल्या उत्तरामुळे गोंधळ उडाल्यानंतर सिंह यांनी सारवासारव केली. राष्ट्रीय क्राईम रेकॉर्ड ब्युरोकडून मिळालेल्या माहितीवरच राज्यसभेत हे उत्तर दिल्याचा दावा राधामोहन सिंह यांनी सीएनएन-आयबीएनशी बोलताना केलाय. ही आकडेवारी आपल्याला राज्यांकडून मिळाली असल्याचं समर्थनही राधामोहन सिंह यांनी केलंय.

दरम्यान, अमरावतीच्या शेतकर्‍यांनी राधामोहन सिंह यांचा निषेध केलाय. केंद्रीय कृषीमंत्र्यांनी लवकर राजनामा द्यावा अन्यथा आम्ही रत्यावर उतरू असा इशारा शेतकर्‍यांनी दिला.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close