बेवारस चिमुकलीचे वर्दीतले ‘मायबाप’ !

July 25, 2015 2:11 PM0 commentsViews:

osmanabad news3325 जुलै : उस्मानाबादमध्ये पोलिसांमधील माणुसकीची चांगली बाजू समोर आली आहे. एका आईची तिच्या अवघ्या एक वषांर्च्या लहान मुलीसमोर निर्घृण हत्या करण्यात आली आहे. हत्या करणार्‍या आरोपीने या चिमुकलीस बेवारस तिथेत सोडून दिलं. सध्या ही मुलगी पोलिसांच्या ताब्यात असून या निष्पाप मुलीच्या नातेवाईकचा शोध घेत आहे.पर्यायाने त्या चिमुकलीला ही पोलीस स्थानकातच राहवे लागत आहे नेहमी कठोर दिसणारे पोलीस ही या चिमुक्लीच्या प्रेमात पडून 2 दिवसांपासून तिची पोटच्या लेकरा सारखी काळजी घेताना दिसत आहेत.

जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथे घडलेल्या एका महिलेच्या खुनाच्या घटनेने अनेकांचे मन हेलावून गेले . तामलवाडी येथील काही मूली गुरुवारी नेहमीप्रमाणे शाळेला जात होत्या मात्र रसत्याच्या बाजूला असलेल्या शेतातुन एका लहान बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकू आला त्यानंतर त्या मूली शेतात गेल्यावर एक भयानक वास्तव समोर दिसले. एक लहान चिमुकली तिच्या आईच्या छिन्नविछिन झालेल्या मृतदेहाजवळ कर्कशपने रडत होती. या घटनेची कल्पना गावकरी यांनी पोलिसांना दिली अणि तामलवाडी पोलीस काही क्षणात तिथे गेले.

या खुनाच्या घटनेची बातमी वार्‍यासारखी पसरली परिसरातील गावकरी तिथे आले मात्र महिलेचा मृतदेह अणि तिच्या जवळ रडणारे गोंडस बाळ पाहून सर्वांच्या डोळ्यात अश्रु आले. एका 28 वर्षांच्या महिलेचा दगडाने ठेचून खून करण्यात आला होता अणि तिचा मृतदेह रानात टाकून मारेकरी पसार झाले होते. या घटनेनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करुन या लहान बाळास ताब्यात घेतले तामलवाडी इथं सापडलेल्या या लहान मुलीसाठी गुरुवारची रात्र आयुष्यातील काळ रात्र ठरली . निरागस मुलीला काहीही समजत नव्हते पण तिच्या आईची हत्या करण्यात आली होती. एरवी आईच्या कुशीत असलेली मुलगी आता तिच्या मृतदेहाजवळ रडत बसली होती . आरोपीने तिच्या आईचा खून करुन तिला अंधारात सोडून पळ काढला. पूर्ण रात्र या मुलीने त्या काळोखात काढली आता ही मुलगी तामलवाडी पोलिसांच्या ताब्यात आहे.

महिलेच्या खुनाप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून तपास सुरू आहे. या घटनेतील मुलीला पोलिसांनी पोलीस ठाण्यात आणले अणि तिला खाकी वर्दीतील पोलिसांची माणुसकी अणि मायेची ऊब मिळाली . तामलवाडी पोलिसतील अधिकारी आणि कर्मचार्‍यांनी या मुलीचा पोटच्या लेकरासारखा संभाळ करत आहेत. या लहान मुलीचा आता पोलीस ठाण्यातील सर्व अधिकारी व कर्मचार्‍यांना लळा लागला असून या मुलीचा सांभाळ ते करीत आहेत. या मुलीला आता पोलीस स्टेशन एका घरासारखे आणि पोलीस परिवारसारखे वाटत आहेत. या मुलीला पाहण्यासाठी नागरिकांनी पोलीस ठाण्यात गर्दी केली असून काहीनी तर तिला दत्तक घेण्याची तयारी दाखवली आहे. गावकरी यांना या मुलीची चिंता लागली असून ते तिचे फोटो काढून तिच्या घरच्यांचा शोध घेत आहेत. या मुलीचे कोणे नातेवाईक किवा या मुलीला कोणी ओळखत असल्यास पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

ही दुष्ये पाहून कोणालाही वाटणार नाही की हे पोलीस ठाणे आहे. जिथे भल्या भल्या गुन्हेगारना धडकी भरते तिथे हेच पोलीस ठाणे या अनाथ मुलीसाठी आश्रयस्थान बनले आहे. या मुलीला खावू घालणे, अंघोळ, खेळवण ही सर्व कामे पोलीस करीत आहेत. पोलीस ठाण्यातील ही दृश्ये पाहिल्यावर पोलिसांनाही माणुसकी असते हेच दिसते.

दरम्यान, या महिलेच्या मारेकर्‍याला अटक करण्यात आता पोलिसांना यश आलंय. 24 तासांच्या आत पोलिसांनी आरोपी सिद्धराम खांडेकर या मारोकर्‍याचा तपास लावलाय. मयत महिलेच्या आधीच्या नवर्‍याच्या भावाच्या मुलाने तिचा खून केल्याचं निष्पन्न झालंय.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close