मंडळाच्या पैशातून 62 लाखांची ऑडी, 71 लाखांच्या 2 मर्सिडीज !

July 25, 2015 8:43 PM0 commentsViews:

ramesh_kadam_ncp25 जुलै : अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ भ्रष्टाचार प्रकरणी सीआयडीचा अहवाल शासनाला प्राप्त झालाय. या प्राथमिक अहवालात राष्ट्रवादीचे आमदार रमेश कदम यांच्यावर 141 कोटींचा भ्रष्टाचार केल्याचे आरोप ठेवण्यात आले आहेत. या अहवालावर नजर टाकली तर कोट्यवधीचे आकडे पाहून डोळे गरगरायला लागतील.

कदम यांनी वेगवेगळ्या संस्थेंमध्ये जवळपास 85 कोटींची गुंतवणूक केलीये. एवढंच नाहीतर स्वत:च्या खात्यावर 5 कोटी ट्रान्सफर केले आहे. महामंडळाच्या 9 कोटी 34 लाखांमधून 16 गाड्यांची खरेदी केलीये. यात 71 लाखांच्या 2 मर्सिडीज, 62 लाखांची 1 ऑडी आहे. 16 गाड्यांच्या खरेदीसाठी 23 लोकांच्या नावानं कर्ज काढण्यात आलीये.

मात्र अद्यापही रमेश कदम गायब आहे. या प्रकरणी 7 जणांवर दहिसर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आलाय. आ.रमेश कदमचा पीए विजय कसबेसह कदम यांच्या बहिणी नकुशा कदम आणि लक्ष्मी लोखंडेंना अटक करण्यात आलीये. नकुशा या महालक्ष्मी दूध डेअरीच्या अध्यक्षा तर लक्ष्मी सचिव आहेत. महालक्ष्मी दूध डेअरीत 5 कोटी 33 लाखांच्या अपहाराचा आरोप आहे. तर पीए विजय कसबे हे जोशाबा सूत गिरणी आणि मैत्री शुगरचे सेक्रेटरी आहे. या दोन्ही संस्थांमध्ये करोडोंचा अपहार झाल्याचा आरोप आहे.

सीआयडीच्या अहवालातील मुद्दे

राष्ट्रवादीचे आ. रमेश कदमांवर 141 कोटींचा अपहार केल्याचा ठपका
जोशाबा मध्यवर्ती ग्राहक संस्था : 41 कोटी 37 लाख
– मैत्री शुगरला 30 कोटी
– संतोष सिव्हिल सर्व्हिस कंपनीला 10 कोटी
– महालक्ष्मी दूध उत्पादक संस्थेला 5 कोटी
– कांदिवलीच्या रहेजा सोसायटीत 2.25 कोटींचा फ्लॅट
– औरंगाबादेत 11 कोटींना 62 गुंठे जागा
– स्वत:च्या खात्यावर 5 कोटी ट्रान्सफर
– महामंडळाच्या 9 कोटी 34 लाखांमधून 16 गाड्यांची खरेदी
– 71 लाखांच्या 2 मर्सिडिज, 62 लाखांची 1 ऑडी
– 16 गाड्यांच्या खरेदीसाठी 23 लोकांच्या नावानं कर्ज

आयबीएन लोकमतचे सवाल
महामंडळात 141 कोटींचा घोटाळा होईपर्यंत सरकार नेमकं काय करत होतं ?
अण्णाभाऊ साठे महामंडळात घोटाळा करणारे आ. रमेश कदम अजूनही गायब का आहेत ?
सीआयडी आ. रमेश कदमांना फरार म्हणून का घोषित करत नाही ?
या घोटाळेबाज आमदाराला राष्ट्रवादीचं नेतृत्व पक्षातून निलंबित का करत नाही ?
घोटाळ्यातला सर्व पैसा सरकार रमेश कदमांकडून पुन्हा वसूल करणार का ?

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close