बायको आणि मुलाची हत्या करुन नवर्‍याची आत्महत्या

December 7, 2009 10:21 AM0 commentsViews: 6

7 डिसेंबर पुण्यामध्ये मुलगी आणि स्वत:च्या बायकोची हत्या करून अमोल कांबळे या व्यक्तीने नंतर स्वत:ही आत्महत्या केली. पुण्यातल्या पाषाण रोडवरच्या श्रध्दा सोसायटीत ही घटना घडली. साधारण रात्रीच्या सुमाराला ही घटना घडल्याचं पोलीसांचं म्हणणं आहे. अमोलची आई सोमवारी सकाळी 9.30 च्या आसपास त्यांच्या फ्लॅटवर आली असता बराच वेळ दरवाजा न उघडल्याने शेजार्‍यांच्या आणि वॉचमनच्या मदतीनं दरवाजा उघडला आणि ही धक्कादायक घटना घडल्याचं उघडकीस आलं. अर्थिक विवंचना आणि कौटुंबिक वाद अशा गोष्टींना कंटाळून अमोल कांबळेने बायको आणि मुलीला मारुन स्वत:ही आत्महत्या केल्याचं समजतं.

close